Tuesday, 11 October 2016
शेतीपशुपालन विभागातील वियार्थ्यानी शाळेतील शेतीमध्ये ड्रीप ची जोडणी करून मल्चिंग पद्धतीचा वापर शेतात केला.
भिवडी हे गाव तसे पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडत असल्याने पाऊस अतिशय कमी पडतो.
शेती ही हंगामी असल्याने गावातील बहुतेक शेती पडीक असते.आम्ही विद्यार्थी वर्तमान
पत्रामध्ये नेहमी शेतीच्या यशोगाथा बद्दल आयकत असतो. शाळेची पाणी ही मोठी समस्या
असल्याने शेतात कमी पाण्यामध्ये पीक कसे घेता येईल याचा अभ्यास केला. व लगेच ड्रीप
ची जोडणी करून पाडलेल्या साऱ्यांवरती पाईप पसरून दिलेत व नंतर मल्चिंग पेपर बेड वरती
अंथरला.अशा प्रकारे इ १० वी च्या वर्गातील आम्ही विद्यार्थ्यांनी ड्रीप व मल्चिंग
पद्धतीचा वापर शेतात केला.
Wednesday, 5 October 2016
विद्यार्थ्यांनी LED बल्ब पासून सजावटीची माळ बनविण्याचे प्रशिक्षण आय.बी.टी मध्ये घेतले
आय.बी.टी. मधील उर्जा पर्यावरण विभागामध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक च्या मुलभूत गोष्टीची तोंडओळख करून दिली जाते. त्यामध्ये विद्यार्थी वायरिंग चे आणि सर्किट चे विविध प्रकार हाताने करून पाहतात व अभ्यासतात.या सर्व गोष्टी ते एक प्रकल्प हाती घेऊन तो पूर्ण करताना शिकतात.
यावेळी गणपती आणि दिवाळीच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी LED बल्ब पासून लाईट माळ तयार करण्याचे ठरविले व निदेशकांच्या मदतीने त्यांनी २ माळ तयार केल्या.
यावेळी गणपती आणि दिवाळीच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी LED बल्ब पासून लाईट माळ तयार करण्याचे ठरविले व निदेशकांच्या मदतीने त्यांनी २ माळ तयार केल्या.
विद्यार्थ्यांनी शाळेमध्येच बनविल्या राख्या
आय.बी.टी मधील गृह आरोग्य विभागामध्ये विद्यार्थ्यांना अन्न पदार्थ प्रक्रिया आणि आरोग्य विभागाविषयी कौश्ल्यांसोबतच शिवान काम, भरत काम, विणकाम आणि नवनवीन प्रकारच्या डिझाईनच्या समाजोपयोगी वस्तू बनविण्यास शिकविले जाते.
यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलींना कमी किंमतीमध्ये राखी तयार करून उपलब्ध करून द्यायचे ठरविले. या राखी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी जवळजवळ २०० ते २५० राखी तयार केली व विद्यार्थी आणि शिक्षकांना त्या विकल्या.

Thursday, 22 September 2016
आय.बी.टी. च्या विद्यार्थ्यांनी १० वी च्या प्रकल्प अंतर्गत अझोला तयार केला
आय.बी.,टी अभ्यासक्रमाचा एक महत्वपूर्ण भाग म्हणजे इयत्ता १०वि तील प्रकल्प. याअंतर्गत शेती पशुपला या विभागातील विद्यार्थ्यांनी अझोला एक पुस्तिक जनावरांचे खाद्य तयार केले आहे. हि फक्त पाण्यावर एका बेड मध्ये वाढविता येते. जनावरांसाठी अतिशय फायद्याचे असून आमचे विद्यार्थी हे गावातील शेतकऱ्यांना मोफत वाटणार आहेत व अझोला कसा तयार करावा याचे मार्गदर्शन देणार आहेत.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील आय.बी.टी. कार्यक्रमाची सुरुवात दिनांक १६/६/२०१६ झाली
दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आय.बी.टी. कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या जोमाने माच्या शाळेत अगदी पहिल्या दिवशी झाली. यावर्षी आय.बी.टी. साठी माच्या शाळेचे एकूण १३५ विद्यार्थी आहेत. प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी आय.बी.टी. कार्यक्रम चालतो.
आमच्या शाळेची आदर्श आय.बी.टी. कार्यक्रम चालवणाऱ्या १६ शाळांमध्ये २ वर्षापुपूर्वी निवड झाली आहे. हा कार्यक्रम प्राज फौंडेशन आणि विज्ञान आश्रमाच्या सहाय्याने चालविला जातो. तसेच यास Lend-A-Hand India या हि साठेची मदत मिळते.

Subscribe to:
Posts (Atom)