Tuesday, 11 October 2016
शेतीपशुपालन विभागातील वियार्थ्यानी शाळेतील शेतीमध्ये ड्रीप ची जोडणी करून मल्चिंग पद्धतीचा वापर शेतात केला.
भिवडी हे गाव तसे पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडत असल्याने पाऊस अतिशय कमी पडतो.
शेती ही हंगामी असल्याने गावातील बहुतेक शेती पडीक असते.आम्ही विद्यार्थी वर्तमान
पत्रामध्ये नेहमी शेतीच्या यशोगाथा बद्दल आयकत असतो. शाळेची पाणी ही मोठी समस्या
असल्याने शेतात कमी पाण्यामध्ये पीक कसे घेता येईल याचा अभ्यास केला. व लगेच ड्रीप
ची जोडणी करून पाडलेल्या साऱ्यांवरती पाईप पसरून दिलेत व नंतर मल्चिंग पेपर बेड वरती
अंथरला.अशा प्रकारे इ १० वी च्या वर्गातील आम्ही विद्यार्थ्यांनी ड्रीप व मल्चिंग
पद्धतीचा वापर शेतात केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
छान सर
ReplyDelete