श्री दत्त शिक्षण संस्था सासवड या संस्थेचे हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल भिवडी या विद्यालयाची स्थापना जून १९९४ मध्ये गावातील मारुती मंदिरामध्ये झाली. श्री . शामकांत विठ्ठल भिंताडे हे अध्यक्ष तर डॉ. लक्ष्मण अनंतराव वांडेकर हे सचिव म्हणून काम पाहत आहेत. विद्यालयाची सुसज्ज इमारत असून २४४ विध्यार्थी अध्ययनाचे तर ९ अध्यापक अद्यापनाचे काम करत आहेत. तर ४ शिक्षकेतर कर्मचारी विद्यालयाला सुसज्ज ठेवण्याचे काम करत आहेत. विद्यालयामध्ये स्वच्छतागृह , प्रयोगशाळा , संगणक कक्ष , कार्यालय, मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाक घर, स्वच्छ पाण्याची सुविधा , प्रशस्त मैदान इ. सुविधा उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment